गर्द वृक्षाच्या निबीड शाखेत
निपचित पहुडलेलं एक पान,
अनाहूत स्त्रवावी त्याच्या पर्णरेखांतून
उष्ण रंगांची ओली सळसळ...
गच्च व्हावी शीर अन् शीर,
भेदावे सर्वच फाटे...
सुषिर होऊन प्राण श्वासावा
प्राणपणाने;
नि फाटून जावं
पडलेल्या सखोल चिरेतून आरपार...
मग पुन्हा तरारून यावं,
चिरांसहीत - खाचांसहीत
वळणदार रेघांसहीत
एकसंध प्राणासहीत
तल्लीन व्हावं,
व्यामिश्रतेच्या उष्ण रंगांत...
पानभर पसरावी
सजीव थरथर,
सशब्द व्हावीत पर्णकंपने...
ऐकताना भिन्न षड्ज,
गानसरस्वतीचा!
- चारुश्री
व्वा खूप सुंदर
ReplyDelete🙏🙏
Deleteखूप छान
ReplyDelete🙏🙏
Deleteअप्रतिम !
ReplyDelete🙏🙏
DeleteSuperb
ReplyDelete🙏🙏
Deleteवाह 🌹 अप्रतिम 🙏
ReplyDeleteधन्यवाद
Deleteधन्यवाद🙏
Deleteचारुश्री प्रतिभासंपन्न आहेस तू. देवी शारदेने साहित्य शारदा आणि संगीत शारदा ह्या दोन्ही स्वरुपात तुला कृपांकित केले आहे.
ReplyDeleteही खूपच मोलाची प्रतिक्रिया आहे. खरंच थँक्यू आत्या🙏🙏
ReplyDeleteक्या बात है, छान झाली आहे कविता.
ReplyDeleteधन्यवाद🙏
Delete