Wednesday, 21 June 2023

भिन्न षड्ज



गर्द वृक्षाच्या निबीड शाखेत 
निपचित पहुडलेलं एक पान,
अनाहूत स्त्रवावी त्याच्या पर्णरेखांतून 
उष्ण रंगांची ओली सळसळ...
गच्च व्हावी शीर अन् शीर, 
भेदावे सर्वच फाटे...
सुषिर होऊन प्राण श्वासावा
प्राणपणाने; 
नि फाटून जावं 
पडलेल्या सखोल चिरेतून आरपार...
मग पुन्हा तरारून यावं,
चिरांसहीत - खाचांसहीत 
वळणदार रेघांसहीत
एकसंध प्राणासहीत
तल्लीन व्हावं,
व्यामिश्रतेच्या उष्ण रंगांत...
पानभर पसरावी 
सजीव थरथर, 
सशब्द व्हावीत पर्णकंपने...
ऐकताना भिन्न षड्ज, 
गानसरस्वतीचा!

- चारुश्री

15 comments:

  1. व्वा खूप सुंदर

    ReplyDelete
  2. अप्रतिम !

    ReplyDelete
  3. वाह 🌹 अप्रतिम 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद

      Delete
    2. धन्यवाद🙏

      Delete
  4. चारुश्री प्रतिभासंपन्न आहेस तू. देवी शारदेने साहित्य शारदा आणि संगीत शारदा ह्या दोन्ही स्वरुपात तुला कृपांकित केले आहे.

    ReplyDelete
  5. ही खूपच मोलाची प्रतिक्रिया आहे. खरंच थँक्यू आत्या🙏🙏

    ReplyDelete
  6. क्या बात है, छान झाली आहे कविता.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद🙏

      Delete

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...