Sunday, 26 June 2022

स्वरार्घ्य

प्रातःषड्जा नमन करुनी
रिषभ-पहाट फुलताना
मंदमंदसा दरवळ येई
गंधार-पुष्प बहरताना..

जाग येतसे वसुंधरेला
अरुणकिरण शलाकांनी
मध्यम-नक्षी मोहक भासे
तीव्र-शुद्ध कवडशांनी..

मध्यान्हीच्या स्थिर समयी
अचल पंचम गूंजतसे
कातरवेळी अधीर धैवत
मनां हुरहूर लावतसे..

निषाद-रात्री नभीमंडपी
तारका लुकलुकताना
आठव होई दिनभराचा
सुरेल प्रवास तरळताना..

अखेर होई दर्शन 
त्या अथांग संगीत-सरितेचे
ब्रह्ममुहूर्ता समयी ती
भू-वरी ह्या विलसतसे..   

तिचे ओजस्वी रूप पाहतां 
चक्षु दिपती पळभरी 
अनेक जन्म घेऊनि परि
संगीत-साधना राहे अधुरी..

अशावेळी मी तिच्या किनारी
शांत बसुनि राहतसे..
तिचीच ओंजळ घेऊनि 
तिजला स्वरार्घ्य मी अर्पितसे..
 
- चारुश्री वझे

18 comments:

  1. अप्रतिम

    ReplyDelete
  2. अप्रतिम.. सहज सुंदर

    ReplyDelete
  3. वा चारुश्री ..Keep it up

    ReplyDelete
  4. अतिशय तरल आणि सुंदर

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर.

    ReplyDelete
  6. स्वरांच सुंदर इंद्र धनुष्य या स्वर पंक्तीतून खुप सुरेख पणे साकारल गेले आहे.या स्वरार्घ्य अर्जनातुन स्वरांची अतिशय सुंदर रांगोळी घातली गेली आहे जी निसर्ग संगीताची उधळण करीत पर्जन्यासमान बरसत शब्द सुरांच वैभव साकारत श्री शारदा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन चिरंजीव झाले आहे.

    ReplyDelete
  7. Khupach Sundar 👌🏼👌🏼👌🏼

    ReplyDelete
  8. Wah wah. चाल लागून सुरेल गायल्यावर आनंद शतगुणित होईल. अभिनंदन.

    ReplyDelete
  9. व्वा!!!!!! चारू👍खूपच छान, अप्रतिम कविता, स्वरांचे सुंदर दर्शन 😍💐👍👍🙏

    ReplyDelete
  10. Wa khup ch apratim mast swarthy nav pan chan

    ReplyDelete
  11. Beautiful lyrics. God bless.

    ReplyDelete
  12. कऺटॆ॑ट खूपच छान'......!!

    ReplyDelete
  13. Wah ! Khup Chhan, apratim 👌👌

    ReplyDelete
  14. सुंदर काव्य.

    ReplyDelete

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...