13 फेब्रुवारी- 'जागतिक रेडिओ दिन'. यंदाच्या 13 फेब्रुवारीला मला FTII,पुणेच्या रेडिओकथन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. नातं माझं रेडिओशी, हा स्पर्धेचा विषय असून तिथे सांगितलेली रेडिओबद्दलची माझी ही खास आठवण-
'नमस्कार, आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र. सकाळचे सहा वाजून पस्तीस मिनीटं झाली आहेत. सादर करीत आहोत, कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी'...
... पाचवी ते सातवी या तीन वर्षांमध्ये रेडिओशी, चिंतन हा चिंतामणीशी आणि त्यातूनही श्रीराम केळकरांच्या ह्या अनाऊन्सनेंटशी खूप गहिरं नातं निर्माण झालेलं. कारण त्यांची 'सकाळचे सहा वाजून पस्तीस मिनीटं झाली आहेत', ही अनाऊन्समेंट झाली रे झाली, की, मी आंघोळ आटपून बाथरूममधून बाहेर यायलाच पाहिजे, हा, कुणीही न घातलेला असा दंडक होता. कारण इथे, तास-मिनीट-सेकंदाचं गणित नव्हतंच मुळी! रेडिओच्या कार्यक्रमांनुसार आमचे कार्यक्रम अध्यहृत असायचे. आजच्या आमच्या भाषेत सांगायचं झालं, तर, 'It has already lined-up'.. तर, सहा वाजून पस्तीस मिनीटं ही वेळ आमच्या बिनकाट्याच्या घड्याळ्याने अर्थात् रेडिओने दिल्यावर, आमच्या घरातली साधारण परिस्थिती अशी- मी आंघोळीहून बाहेर यायचे, बाबा पॅसेजमध्ये दात घासत असायचे आणि आई माझा डबा भरत असायची. मग, एकीकडे आवरताना रेडिओवरची प्रार्थना मी ही आळवायचे- 'हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,..' 'म्हंss, करा करा, जरा प्रार्थना कराच देवाला. तशीही आपल्याकडे बुद्धीची काहीशी कमतरताच आहे'.. दात घासणं किंवा दाढी करणं, काहीही असो. ते करता-करताच बाबा माझी मुद्दाम अशी टर्र उडवायचे. त्यामुळे प्रार्थना आणि माझी खिल्ली हे अध्यहृतच! क्वचितच कधीतरी बाबांनी ही संधी दवडली असेल. मग प्रार्थनेनंतर वामनराव पैंचं प्रवचन सुरू व्हायचं. एरव्ही 'झालं आता प्रवचन सुरू!', असं आपण उपहासाने म्हणतो. पण वामनराव पैंच्या प्रवचनात खरोखरंच विचारपूर्ण असेच उपदेश असायचे. मग ते सुरू असताना 'ऐकलंस का, आत्ता काय म्हणाले ते?', ह्या आईच्या प्रश्नावर मी केस विंचरता-विंचरता 'होss गंs आई' किंवा दूध पिताना मान डोलावूनच होकार द्यायचे. त्यावर 'नुसत्या नंदीबैलासारख्या माना नका डोलावू. प्रत्यक्ष आचरणातंही ते दिसू दे, म्हणजे झालं..' आता, बाबांचा डबा भरता-भरता आईची ही मार्मिक टिपण्णी असायची. कारण माझ्यानंतर तेही ऑफिससाठी बाहेर पडायचे. तर, अशा रीतीने 6.45 पर्यंत 'चिंतन हा चिंतामणीचा' पहिला भाग संपायचा. त्यानंतर लगेचच दत्तू काका म्हणजे माझे रिक्षावाले काका मला घ्यायला यायचे. त्यामुळे 6.35 ते 6.45 या दहा मिनीटात माझं आवरून, आईने कपात ओतलेलं दूध पिऊन, तासिकेनुसार दप्तर भरलंय ना, हे चेक करून आणि पुन्हा डबा-बाटली त्यात भरून मी गेटपाशी जाऊन उभी राहिले, की, माझी शाळा मोहिम फत्ते व्हायची. ..या दहा मिनीटात आमच्या तिघांचीही कामं आणि आमच्यातले 'सुखद-संवाद' रेडिओनुसार lined-up असायचे. ..
.. तर, रेडिओबद्दलची ही माझी अतिशय खास आठवण. कारण कळत-नकळत ती पुन्हा मला माझ्या शाळेतल्या दिवसांत घेऊन जाते..

खुप छान आहे आठवण.
ReplyDelete