‘रुईया फिल्म सोसायटी’ (RFS) तर्फे ३१ जुलै व १ ऑगस्ट २०१४ या दोन
दिवसांमध्ये चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मला सर्वात जास्त
आवडलेल्या ‘Color Of The Sky’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या
चित्रपटाविषयी...
‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’... काहीवेळा शब्दातूनही जेव्हा एखादी गोष्ट सांगता येत नाही तेव्हा ती शब्दातीत असते. त्या मागच्या भावना फक्त समजून घ्यायच्या असतात. त्या गोष्टीतलं मर्म जाणून घ्यायचं असतं. पण त्यासाठी मुळात त्या गोष्टीचं प्रकटीकरण हे सहज-सुलभ असावं लागतं. आणि हेच वैशिष्ट्य आहे डॉ. बिजू यांच्या ‘Color Of The Sky’ या चित्रपटाचं.

एक चोर... माणूस म्हणून चांगला.., पण
परिस्थितीमुळे चोरी करण्यासाठी प्रवृत्त झालेला असा तो, चोरी करण्यासाठी म्हणून
एका वृध्द शिल्पकाराच्या होडीत शिरतो.., त्या चोरामागील चांगल्या माणसाला हेरून तो
शिल्पकार चक्क त्याला स्वतःच्या घरी घेऊन
जातो (इतक्या वर्षांच्या प्रमाणिक कलासाधनेतूनच त्याला ही सूक्ष्म नजर
प्राप्त झाली, हेच बहुदा दिग्दर्शकाला सांगायचं असावं.).., आणि तेथूनच सुरु होतो,
त्या चोराचा माणूस बनण्याचा प्रवास...
यात चोराची व्यक्तीरेखा इंद्रजित याने; तर शिल्पकार नेदुमुडी वेणू यांनी साकारला आहे.
एक बेट... त्याच्या किना-यालगतच असलेलं त्या वृद्धाचं छोटसं-टुमदार घर... घरा-आजुबाजुचा रम्य निसर्ग... आणि त्या घरातील तिघेजणं- एक प्रौढवयीन पुरुष, एक तरुण मुलगी- जी मुकी आहे आणि एक लहान मुलगा. या तिघांचे एकमेकांशी आणि त्या शिल्पकाराशी असलेले संबंध, त्यातली मजा-निरागसता ही प्रत्येकाने तो चित्रपट पाहूनच अनुभवावी.
सुरुवातीला हे तिघेही घरी आलेल्या त्या चोराला स्वीकारत नाहीत. त्यालाही खरंतर तिथे राहायचं नसतं. पण अडचण असते ती दोन बेटांतील त्या समुद्राची! त्याला ना पोहोता येतं; नाही होडी चालवता येत. त्यातूनही आपल्याला त्या वृद्धाने त्याच्या घरी का आणलं, यामागचं कारण न समजल्याने त्या बिचा-याची चांगलीच पंचाईत होते. तो वृद्ध सो़डता कुणीच त्याच्याशी बोलत नाही, ना त्याला कुठलाच प्रतिसाद देत. त्यामुळे त्याची जास्तच चिडचिड होते....
पण हळुहळु हे चित्र बदलत जातं. ते कसं बदलतं हे प्रत्यक्षच पाहण्यासारखं आहे. पण तो माणूस म्हणून चांगला असल्याने सगळ्यांच्याच मनात त्याच्याविषयीची आस्था निर्माण होते. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादातून आणि त्या वृद्ध शिल्पकाराने कळत-नकळतपणे दिलेल्या शिकवणीतून त्या चोराला स्वतःतील माणूस समजतो. निसटून गेलेली स्वतःचीच चांगली प्रतिमा त्याला गवसते. आणि तो वृद्ध आपल्याला त्याच्या घरी का घेऊन आला, हेही त्याच्या लक्षात येतं. कुठलंही नातं नसताना निःस्वार्थीपणे केलेले संस्कार, दिलेलं प्रेम यामुळे तोही अखेर त्या घरातलाच एक अविभाज्य भाग बनतो...
चित्रपट मल्याळी असूनही त्यातील सूक्ष्म-नाजूक भावना प्रेक्षकांना अगदी थेट कळतात. याचं मुख्य कारण म्हणजे साधं-सोपं-सहज-सुंदर असं कथानक, कमीत-कमी संवाद आणि प्रत्येक व्यक्तीरेखेच्या हावभावावर दिलेला जास्तीत-जास्त भर. त्यामुळे सबटायटल्स वाचण्यात प्रेक्षक कंटाळून न जाता त्यांना चित्रपटातील निसर्गाच्या उत्कृष्ट छायाचित्रणाचा छान आस्वाद घेता येतो.
चित्रपटाचा शेवटही काहीसा साहित्यिक पण बोधपर आहे. तो मराठीतून काहीसा असा-
‘आकाश हे नेहमी एकाच रंगाचं नसतं. कधी ते निळेशार, कधी तांबूस, कधी पिवळंफटक, कधी पांढरंशुभ्र, कधी काळकुट्टं; तर कधी रंगमिश्रित असतं. आपलं आयुष्यही असच अनेकानेक रंगांनी बहरलेलं आहे. या रंगसंगतीचा आपण स्वतः किती आनंद घेतो आणि दुस-याला तो किती देतो, यावरच आपलं माणूसपण ठरतं.’
- 'Color Of The Sky'

No comments:
Post a Comment