सायंकाळ
मला किनई ब-याचदा एखाद्या छानश्या डोंगरउतारावर जावसं वाटतं. जिथे पर्यटकांची वा इतरही कुठलीच वर्दळ नाहीये. समोर, आजुबाजूला डोंगररांगा नि भरगच्च झाडं...
...मावळतीच्या सूर्याची पसरलेली पिवळसर-नारिंगी आभा, त्याचा कमी होत जाणारा प्रखरपणा अस्ताच्या समीपतेची चाहूल देतो; प्रत्येकवेळी..क्षणोक्षणी... पक्षीही घरट्याकडे परतताहेत. थकलेला जीव विसावा घेतोय.. सगळच शांत होतयं.. Mature होतयं.. Be Silent, keep silence... काहीतरी सुटलयं-निसटलयं..काही धरलयं..काही मिळवायचयं..काही सोडून द्यायचयं... पण आत्ता त्यापैकी कुठलाच विचार नाही. अनिमिष नेत्रांनी फक्त पाहणं, अस्ताला जाणा-या त्या सूर्याकडे, बस्सं...
...मधूनच हवेची मंद झुळूक येते. खूप आपलसं वाटतं. मनाला रिझवतो तिचा सुखद स्पर्श.. भावनांच्या आवेगाला तिची तरल साथ मिळते. रोमांच फुलतो, उत्साह संचारतो.., तरी शांत असतो आपण.. एकाजागी, एकटक पाहत असतो ढळणा-या सूर्याकडे. नजरच हलत नाही त्याच्यावरुन. अशावेळी कितीही 'क्लिक्-क्लिकाट' केला तरी नाविन्य काही संपत नाही त्यातलं! सूर्य तोच.. पण दरवेळी त्याचा उदयास्त एक वेगळाच फिल देऊन जातो. वेगळं म्हणजे खूप काही भन्नाट आणि युनिक असतं, असं नाही. पण असतं बुवा काहीतरी चुंबकीय तत्त्व, जे नेहमीच आकर्षित करतं आपल्याला!...
... त्या एकटक बघण्यात मग तंद्रीच लागते. स्वतःला switch off करतो. रादर, नकळतच स्वतःला विसरुन जातो. आजुबाजूचं शांत-निवांत वातावरण.. त्याला पाहण्यात गढून गेलेली आपली नजर नकळतपणे स्वतःवरच रोखली जाते. बाह्यतः जरी स्वतःला पूर्ण विसरलेलो असलो तरी अंतर्गत संवाद सुरु होतो.., नि चालूच राहतो अव्याहतपणे.. प्रत्येकवेळीच सादेला प्रतिसाद, क्रियेला प्रतिक्रिया नाही दिली जात. तरीही संवाद चालूच राहतो... खोल तळातून काहीतरी निघत असतं.., अस्फुट-अबोल.., तरीही अर्थमय!.. अर्थांची शृंखला नसते; पण त्यातलं गमक कळत जातं. तो हळूहळू उलगडत जातो.., नि त्याचं संपूर्ण आकलन होणार तोच आपली नजर सूर्यावरुन हटलेली असते, एका वेगळ्याच विश्वात गुंगून गेलेली असते.. आणि नजरेआडच सूर्य गुडुप होतो... कदाचित् म्हणूनच त्याला पाहण्याची ओढ नेहमीच दाटून येते.
... सूर्यास्त होतो. नकळतच.. पण काहीतरी देऊन जातो. अस्तानंतरच्या उदयाची जणु ग्वाहीच असते ती.., पुन्हा नव्याने नाविन्य जोपासण्यातली गंमत असते त्यात!.. आणि आपली पावलंही मग सहजतेने परतीची वाट धरतात... ...पुन्हा आपल्या गावात., आपल्या शहरात.., आपल्याच विश्वात...
अशी सुखद संध्याकाळ खरोखरच अनुभावावि
ReplyDeleteखरच... खुप सुंदर...:)
ReplyDeleteहे विश्वची माझे घर म्हणत ... निसर्गाशी संवाद करून मानवी वैश्विक नातं निर्मण केलसं
ReplyDeleteसुंदर लेख. निसर्गाचे लेण लेवून आलेला.
ReplyDeleteव्वा.....सुंदर
ReplyDeleteतादात्म्य पावने या शब्दाचा अर्थ काय असेल बरे या प्रश्नाचे उत्तर इथे मिळाले, लेखिका ज्या प्रकारे निसर्ग अक्षरशः पिते ते वाचून. उत्तम जोगदंड
ReplyDeleteखरंच हि संध्याकाळ कधी संपूच नये अस वाटतं
ReplyDeleteYes true ...sunder varnan kelay ...all d best
ReplyDeleteYes true ...sunder varnan kelay ...all d best
ReplyDeleteसंधिकालाचे खरच खूप छान चित्र चितारलेस,
ReplyDeleteकुंचला नसे जरी...
संधीकालाचे गीतही ऐकू आले,
गीती शब्द ना जरी....
click --clikcat a perfect word मराठी शब्दकोशात fit होइल.
Khup chan ,god bless u
ReplyDeleteKhupach Chan Charushree...wachtana kharach te drushy dolyasamor yet hote...
ReplyDeletechan bhatti jamali aahe, suryastashi kelela taral samwad !
ReplyDeleteall the best,keep it up!
खुप छान लिहलय...हे सगळं वाचून माझी एक कविता आठवली..
ReplyDeleteपार दूर दाही दिशा धुंद झाल्या
नभाच्या सावल्या नभात विराल्या
तुझे गुज सांगणारया त्या कळया
अबोल होत्या का अशा मूक झाल्या..
काजव्यांना आता रात होई मोकळी
तारकांना तीही भासली कृष्णकाळी
गहिरी निळाई कधीची लुप्त झाली
तुझ्या आसमंती दाटे काजळकाळी..
हाय माध्यान्हीचा कैसा हा कहर
मने थिजली भिजले मग अंतर
कडा जाहल्या गडद काही पुसट
माझ्या मनीची असे ती घुसमट....
- महेश
Keep it up..god bless you..
He varnan tar nisargachya madhyamatun kelelya dhyanachya anubhutiche aahe...lekhika sanwedanshil aahe, yat shanka nahi
ReplyDeleteVery well written, I'm impressed by the writers sensitivity at this tender age.
ReplyDeleteGod bless u Charushree
अप्रतीम लिखाण. फार आनंद वाटला.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteछान
ReplyDeleteछान
ReplyDeleteछान लिहिलंय 👍
ReplyDelete