शाळा…
दिव्याच्या ज्योतीने आपणांस प्रकाश मिळतो..,
सूर्याच्या किरणांमुळे लवकर उठून शाळेत जातो.
शाळेतल्या शिकाविण्याने आपण पुढच्या वाटेकडे पाहतो..,
शाळेतल्या गोंजाराण्याने हळुवार फुलतो.
हे एक विद्येचे मंदीर आहे असे शाळा आम्ही मानतो..,
शाळेत आल्यावर विद्येला नमन करतो.
शाळेतल्या विद्येचे आम्ही एक भक्त आहोत..,
तिची पुजा करण्यासाठी आम्ही एक पुजारीही आहोत.
पूर्वजांचा आम्ही इतिहास शिकतो..,
त्यांनी केलेल्या चुका टाळण्याचा चिकाटीने प्रयत्न करतो.
शाळेत थोर जनांचा, थोर क्रांतीकारकांचाही आम्ही इतिहास शिकतो..,
त्यांनी दिलेल्या बलिदानाचा आदर करतो.
आमुच्या लहानग्यात मायबोली वाढते..,
उजळ प्रेमाने आम्हांस करूणा देते.
हातात हात धरून आम्ही यश मिळवितो..,
आमुच्या थोर सुभेदार वाडा शाळेचे नाव कमवितो.
आम्हीही नाव कमवितो उच्चापदाचे..,
पण त्याचे सगळे श्रेय अमुच्या मायबाप व शिक्षकांचे.
अशा या आमुच्या थोर सुभेदार वाद या शाळेचा दिवा उजळत राहो..,
अशा या शाळेची उज्वल परंपरा दिव्य होत राहो….
---चारुश्री वझे
कवितेस 'कल्पकला सांस्कृतिक मंच' या आंतरशालेय
स्पर्धेत इ.- सहावीत प्रथम पारितोषिक
No comments:
Post a Comment